अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या काळात झी चोवीस तासला दिलेली एक्सक्लुझिव मुलाखत. ही मुलाखत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी घेतली असून या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्याच्या राजकारणापासून दूर राहण्याच्या मुद्यावर पंकजा मुंडे म्हणतात की,'मला राष्ट्रीय पातळीवरची जरी जवाबदारी दिली गेली असली तरी पुढची जवाबदारी काय हे अजून ठरलेलं नाही, कारण अजून बैठक झालेली नाही, चंद्रकांत पाटील हे म्हणाले आहेत की मी राज्याच्या कोर कमिटीमध्ये आहे, तेव्हा राज्याच्या राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्न येत नाही.'
नव्या कारकीर्दबाबत त्यांना विचारले असता,' लॉकडाऊनमुळे बाहेर पडू शकले नाही, आजारीही होते, म्हणून त्यानंतर बाहेर पडण्याचे ठरवलं, म्हणून नव्या दमाने सर्व गोष्टी सुरू करणार आहे, जे आधी काम करत होते तेच करणार आहे, आता तर विरोधी पक्षात आहे.'
भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचे म्हटले जातेय. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की,' मी अशा चर्चांकडे चर्चा म्हणून बघते, अशा चर्चेला गांभीर्याने घेत नाही.'
याचप्रमाणे या मुलाखतीत राज्यातील खास करून बीडमधील पूर परिस्थिती, मराठा आरक्षणाचा मुद्दा, MPSC परीक्षा, मुख्यमंत्र्यांची कार्यशैली आणि जलयुक्त शिवार यावर आपली मते मांडली आहेत. ही संपूर्ण मुलाखत खालील व्हिडिओत पाहता येईल.