...तर कारवाईला तयार राहा; पालिकेचा गणेश मंडळांना इशारा

येत्या 12 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी आहे.

Updated: Sep 10, 2018, 08:25 PM IST
...तर कारवाईला तयार राहा; पालिकेचा गणेश मंडळांना इशारा  title=

मुंबई: परवानगी नाकारण्यात आलेल्या गणेश मंडळांनी बेकायदेशीर मंडप उभारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांनंतर सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी २८१ मंडळांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. 

महापौर, आयुक्त आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यातील बैठकही निष्फळ ठरली. न्यायालयाचे आदेश असल्याने बेकायदा मंडपांसाठी परवानगी देता येणार नाही. त्यामुळे बेकायदा मंडप उभारल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. 

मात्र, याबाबत येत्या 12 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. तिथे याबाबतचा निर्णय होईल.  रस्त्यावर मंडप उभारताना न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका, अग्निशमन दल आणि वाहतुकीचे नियम अशा अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.