Mumbai : केमिकल इंजिनियर होण्याच स्वप्न होतं पण... परीक्षा संपल्यानंतर IITच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीतून आणखी एका विद्यार्थ्याने दर्शनला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले होते. त्यानंतर इमारतीच्या खाली दर्शनचा मृतदेह आढळून आला.

Updated: Feb 13, 2023, 12:59 PM IST
Mumbai : केमिकल इंजिनियर होण्याच स्वप्न होतं पण... परीक्षा संपल्यानंतर IITच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल title=

Mumbai News : मुंबई आयआयटीमध्ये (Bombay IIT) 18 वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवई (powai) इथे असलेल्या आयआयटीत पहिल्या वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने रविवारी हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेतली. दर्शन सोलंकी (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबाद येथील होता. तीन महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. दर्शन हा आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता आणि वसतीगृहातच राहत होता. रविवारी वसतिगृहाच्या इमारतीवरुन दर्शनने सातव्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीतून आणखी एका विद्यार्थ्याने दर्शनला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले होते. त्यानंतर इमारतीच्या खाली दर्शनचा मृतदेह आढळून आला.

दर्शन इतर विद्यार्थ्यांसोबत फार कमी बोलायचा. दर्शनचा त्याच्या रुम पार्टनरसोबतही फारशी संवाद नव्हता. दर्शनने एकटेपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असावा असा अंदाज आहे. दर्शनच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षाही संपल्या होत्या. त्यानंतर रविवारी त्याने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांनी दिली.