मुंबई : BMC ने 31 मे ते 1 जून या कालावधीत 24 तास पाणीकपात जाहीर केली आहे. त्यामुळे या काळात मुंबईतील बहुतांश भागात पाणीपुरवठा केला जाणार नाहीय. ज्यामुशे 31 मे रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून मुंबईत 24 तास पाणीकपात केली जाणार आहे. पाण्याच्या मुख्य भागावर सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम पाहता संसाधनात कपात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
या काळात कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि मालाड या दाट लोकवस्तीच्या भागाला पाणीकपातीचा फटका बसणार आहे.
बोरिवली, कांदिवली, दहिसर आणि मालाडमधील पाणीपुरवठा मंगळवार, 31 मे रोजी सकाळी साडेआठ ते बुधवार, 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. 24 तास पाणीपुरवठा कपातीमुळे अनेक घरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
उत्तर मुंबईतील पश्चिम उपनगरी भागात 31 मे रोजी दिवसभर पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
BMC ने लोकांना दैनंदिन वापरासाठी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कालावधीत पाण्याचा विवेकपूर्वक वापर करा असे देखील आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
तसेच गरज भासल्यास महापालिकेकडून बाधित भागात पाण्याचे टँकर पुरवले जातील असे देखील त्यांनी सांगितले.
त्यानंतर 1जूनपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असे बीएमसीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.