राज्य सरकारची पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारस केंद्र सरकारने नाकारली

विरोधी पक्षाने समोर आणला हमीभाव तक्ता

Updated: Jul 5, 2018, 12:30 PM IST
राज्य सरकारची पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारस केंद्र सरकारने नाकारली title=

दीपक भातुसे, मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाचे राज्य सरकारने स्वागत केलं आहे. पण राज्य सरकारने केलेल्या विविध पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारसच केंद्र सरकारने स्वीकारली नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव आणि राज्य सरकारने शिफारस केलेला हमीभाव याचा तक्ता विरोधी पक्षाने समोर आणला आहे. राज्याने केंद्राकडे 16 पिकांच्या हमीभावाची शिफारस केली होती. मात्र यापैकी एकही पिकाच्या हमीभावाची राज्याची शिफारस केंद्राने मान्य केली नाही. उलटपक्षी अनेक पिकांना राज्य सरकारने शिफारस केलेल्या पिकापेक्षा निम्मा हमीभाव जाहीर केला. पुढील तक्त्यावर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते

राज्य सरकारने केंद्राकडे केलेली शिफारस

https://lh3.googleusercontent.com/-F4NNq1EdoU4/Wz23eXEbixI/AAAAAAAAJKg/bJk2IbqP8fEI1avSljFMXWa2ClQ6jfYywCL0BGAYYCw/h1032/fa9a512b-7e93-4c6d-9c78-aae4fd8913f6