मुंबई : CM Uddhav Thackeray big announcement : आमदारांची पुन्हा चांदी झाली आहे. आधी निधी वाढविण्यात आला. आता मुंबईत हक्काचे घर मिळणार आहे. 300 आमदरांना मुंबईत घरे देण्यात येणार आहे, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधीमंडळात सुरु असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली. त्याआधी आमदार निधीत 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. आमदार निधी 4 कोटींवरुन आता 5 कोटी झाला आहे.
मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घरे बांधण्यात येणार आहे. ही 300 घरे म्हाडाकडून बांधून दिली जाणार आहेत. निवडणूक काळात घोषणा केल्या जातात. मग, सत्ता आल्यावर विसरून जातात. काही म्हणतात असे बोलावं लागते. (भाजपला टोला) पण, महाविकास अगदी सरकार हे फक्त बोलणारे सरकार नाही तर करून दाखविणारे सरकार आहे. आज निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी जो निर्णय घेतला. ते आम्ही करून दाखविणारच हे आश्वासन मंत्रिमंडळाच्या आणि सरकारच्यावतीने देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले की, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावे, आमदार असेपर्यंत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.