मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
शेतक-यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उच्च स्तरीय मंत्रीगटासोबत विधिमंडळात बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत शेतक-यांच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, विष्णू सावरा, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत.
शेतकऱ्यांचे आम्ही समाधान करू याची आम्हाला खात्री आहे. आम्ही शेतकऱ्यांशी सुरुवातीपासून संपर्कात होतो. मोर्चा काढू नये, चर्चा करावी अशी विनंती आधीच केली होती. मात्र शेतकरी हे मोर्चाबाबत ठाम होते, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले.