मुंबई : INS विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची आज सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. सलग चार दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत सोमय्या यांची चौकशी होणार आहे.
आजची चौकशी झाल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. शुक्रवारी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकार आणि हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या (Nandkishor Chaturvedy) पार्टनरशिपसंदर्भात योग्य माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने लपवलं आहे, आज नाही तर उद्या तो निश्चित बाहेर येईल, गुरुवारपर्यंत तपासात सहकार्य करण्यासाठी यायचं आहे रोज, पण शुक्रवारी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकार आणि नंदकिशोर चतर्वेदीच्या पार्टनरशिपसंदर्भात योग्य माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना देणार आहे असं सोमय्या यांनी म्हटलं आहे
नंदकिशोर चतुर्वेदीचे उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि तेजय ठाकरे यांचे व्यावहारीक संबंध असल्याचंही समोर आलं आहे. श्रीजी होम्स घोटाळ्यातही नंदकिशोर चतुर्वेदीचा हात आहे. नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे, त्याला लपवण्यासाठी ठाकरे सरकारने काही तरी कारस्थान केलं असणार असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महाराष्ट्राला ठाकरे परिवार लुटत आहे ते थांबवणं आणि माफिया घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई यावर आमचं लक्ष आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हातात आला तर आणखी माहिती हातात येईल. ठाकरे परिवाराने किती मनी लॉन्ड्रींग केलं हे कळेल, असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं.