Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Alliance : शिवशक्ती-भिमशक्तीच्या प्रयोगाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत दिले होते. पण महाविकासआघाडी(Maha Vikas Aghadi) त्यांना सामील करुन घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादीचा(NCP) विरोध आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार का? हा प्रश्न अजुनही निरूत्तरीतच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे असं सांगत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी याचं खापर काँग्रेस-राष्ट्रवादीवरच फोडल आहे.
वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रश्न विचाराधीन आहे असं अजित पवार सांगतात याचा अर्थ नाही असा होतो, त्यामुळे आता आम्हाला सोबत घ्यायचं की नाही हे ठाकरेंनी ठरवावं असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या सहभागाचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात टोलवला आहे.