मुंबई : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. राज्यात रक्ताचा साठा कमी आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी रक्तदान केले.
राज्यात सध्या जाणवणाऱ्या रक्ताच्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रक्तदान केले.
BreakingNews । मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी केले रक्तदान । राज्यात रक्ताचा साठा कमी । रक्तदान करण्याचे करण्यात आले होते आवाहन@ashish_jadhao #Coronavirus#COVID19 @CMOMaharashtra pic.twitter.com/qvflWHuOsp
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 25, 2020
आवश्यक असणारे रक्त सध्या कमी प्रमाणात आहे. रक्ताचा भविष्यात तुटवडा पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य राज्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेलाही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटावर मात करीत असताना अन्य रुग्णांना उपचारात रक्ताची मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याची आवश्यकता भासते. अशावेळी त्यांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी आणि राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून रक्तदान करणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री राजेंद्र-पाटील यड्रावकर यांनी सांगितले. आज त्यांच्या पत्नी, मुलगे, भाऊ, बहिणी, भाची, पुतणे अशा २० जणांनी रक्तदान केले.