मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित असलेल्या युसूफ लकडावालाकडून (Yusuf Lakadawala)80 लाख कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट करत कागदपत्रही शेअर केली होती. संजय राऊत यांच्या आरोपाने राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. मोहित कंबाज यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा युसूफ लकडावालाबरोबरच एक जुना फोटो शेअर केला आहे. कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये दाऊद इब्राहिमचे सर्व हस्तक एकत्र? असं कॅप्शन देत ट्विट संजय राऊत यांना टॅग केलं आहे.
Dawood Ibrahim के सभी गुर्गे एक साथ ?@rautsanjay61 pic.twitter.com/NWXhsmijGz
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 27, 2022
त्यानंतर मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा युसूफ लकडावालाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. आता राऊत यावर काय बोलणार? दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी पवारांचे काय संबंध आहेत? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
लवंडे राउट का क्या बोलना है इसपे ?
Dawood Ibrahim के गुर्गे का क्या सम्बन्ध है पवार साहब के साथ ? @rautsanjay61 pic.twitter.com/tfUBSFHSdn— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 27, 2022
संजय राऊत यांनी काय केले होते आरोप?
खासदार नवनीत राणा यांनी 'डी' गँगचा फायनान्सर लकडावाला यांच्याकडून कर्ज घेतलं. गेल्या 15 दिवसांत जे घडतंय त्यामागे 'डी' गँगचा पैसा लागलाय. राणा दाम्पत्य यांचे 'डी' गँगसोबत संबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आलाय. हा तपासाचा भाग असूनही ईडी याचा तपास का करत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राणा दाम्पत्याचे 'डी' गँगसोबत संबंध असल्याचं समोर येतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी करता मग यांची का नाही? ही सरळ सरळ मनी लाँड्रींगची केस आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात? नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर हे भाजपचे नेते पोपटासारखे बोलत होते. तेच फडणवीस आता गप्प का आहेत? बोला, फडणवीस बोला जे वातावरण बिघडवून देश तोडू पाहत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही आहात का? असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीस यांना केला.