सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाला ईडीचा 'शॉक', करोडोंची मालमत्ता जप्त

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची मुलगी प्रीती (priti shinde) आणि जावई राज श्रॉफ यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली आहे.  

Updated: Mar 16, 2021, 01:02 PM IST
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाला ईडीचा 'शॉक', करोडोंची मालमत्ता जप्त title=

मुंबई : आताची मोठी बातमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची मुलगी प्रीती (priti shinde) आणि जावई राज श्रॉफ यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने (Enforcement Directorate ) जप्त केली आहे. ही ईडीची मोठी कारवाई आहे. मनी लॉड्रिंग (Money Laundering Case) कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत.

सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या नातेवाईकांवर ईडीने मोठी कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुशीलकुमार यांची मुलगी प्रीती श्रॉफ (priti) आणि जावयाची सुमारे 35.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.  

मनी लॉड्रिंग कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता मुंबईत अंधेरीमधील आहेत. 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची बहीण आहे.