Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या

Why Did Rohit Sharma Not Retire After MCG Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 13, 2025, 08:40 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या  title=
Photo Credit: PTI

Rohit Sharma Retirement: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये टीम इंडिया तसेच क्रिकेटप्रेमींना कर्णधार रोहित शर्माकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु संपूर्ण स्पर्धेत त्याला कामगिरी करता आली नाही. एवढेच नाही तर या मालिकेदरम्यान  त्याला कर्णधारपदही फारसे नीट भूषवता आले नाही. पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाला मागील चार सामन्यांमध्ये तीन पराभवांना सामोरे जावे लागले. यामुळे रोहित  मालिकेदरम्यानच तो निवृत्ती जाहीर करेल अशी अपेक्षा होती. रोहितच्या निवृत्तीच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण 'हिटमॅन' शर्नेमानेही पुढे खेळण्याचा निर्णय घेतला आणि निवृत्ती जाहीर केली नाही.

हितचिंतकांकडून सल्ला

आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही स्पर्धा संपली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माने मेलबर्न कसोटीनंतर निवृत्ती का जाहीर केली नाही, अशी चर्चा होत आहे.  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेलबर्न कसोटीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्त होणार होता. पण त्याचा हा निर्णय बदलला. या बदलेल्या निर्णयामागे त्याच्या 'हितचिंतकांकडून' मिळेल सल्ला कारणीभूत होता. 

हे ही वाचा: रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा

 

टाईम्स ऑफ इंडियाला त्याच्या स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले  की, एमसीजीमधील पराभवानंतर रोहित शर्माने आपला निर्णय घेतला होता. पण मैदानाबाहेरील त्याच्या काही हितचिंतकांनी त्याला आपला विचार बदलण्यास भाग पाडले. अन्यथा ऑस्ट्रेलियात आणखी एक निवृत्ती पाहायला मिळाली असती.

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट

मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. जिथे विरोधी संघ ऑस्ट्रेलियाने चौथी कसोटी 184 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकण्यात यश मिळविले.