मुंबई : Sanjay Raut on ED And IT Raid : केंद्रातील तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या घरावर छापा मारण्यात येत आहे. मात्र, भाजपच्या एकाही नेत्यावर असा छापा मारलेला नाही. ED आणि IT च्या धाडी आमच्याकडेच का? भाजपचे लोकं रस्त्यावर कटोरा घेऊन फिरत आहेत का, असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी ईडी हे भाजपचे एटीएम मशीन आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला. (ED is BJP's ATM machine - Sanjay Raut)
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. ईडी हे भाजपचं एटीएम मशीन आहे. ईडीचे रॅकेट मुंबईतल्या बिल्डर्सकडून खंडणीखोरी करत आहे. बिल्डर अविनाश भोसले यांच्या कंपनीसह अनेक नामांकित कंपन्यांवर ईडीच्या धाडी पडताच या मोठ्या कंपन्यांनी ईडीचे अधिकारी नवलानी यांच्या अकाऊंण्टमध्ये पैसे जमा केल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
ईडी भारतीय जनता पार्टीची एटीएम मशीन बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 28 फेब्रुवारीला पत्र दिले आहे. नोयडामधून मलबार हिलमध्ये स्थित झालेला व्यक्ती 6 हजार कोटी संपती कशी झाली ट्रायडन ग्रुप मोठा कसा झाला हे सांगा? आयकर रेडची भानामती भुताटकी कोण करतंय याची पोलखोल शिवसेना करणार आहे. ईडीचे चार वसुली एजंट आणि 1 किरीट सोमय्या असे 5 ईडीचे एजंट आहेत. ईडीचेअधिकारी 50 हजार कोटी रुपये खर्च करून उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढत आहेत. ईडीचे काही अधिकारी आणि एजंट , कार्पोरेट बिल्डर यांना धमकावत आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी यावेळी केलेत.
मुंबईतील 10 बिल्डर कडून कन्सल्टन्सी फी घ्यायचा. दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवले जाते आहे. या रॅकटमध्ये भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. नवलानी यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त यांना या खंडणी विरोधात एफआयआर केस नोंदवणार आहोत. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत. क्रिमिनल सिंडीकेट नेक्सेससाठी मुंबई पोलीस तपास आजपासून सुरू झाला आहे.
ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे. ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात, ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. जितेंद्र नवलानी याने 100हून अधिक बिल्डर डेव्हलपर यांच्याकडून धमकावून पैसे लुबाडले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. नवलानी हे इडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत 2017 मध्ये इडी ने दिवान हाऊसिंग सोसायटी ची चौकशी केली तेव्हा नवलानी यांनी 10 कोटी यांना 7 कंपनीत भोसले यांनी पैसे पाठवले. दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवलं जातं आहे. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहोत. यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
जून 2015 लाख किरीट सोमय्या यांनी जीव्हीके कंपनीवर एअरपोर्ट जमिनी हडपली या बाबतीत तक्रार केली. मुंबई पोलीस तक्रार करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. किरीट हा सिरीयल कंम्पलेनंट आहे. किरीट सोमय्या महान आत्मा आहे. सगळ्यांबाबत प्रश्न विचारता, पीएमसीए बॅंक अणि वाधवान बिल्डर यांचे संबंध काय, हा प्रश्न मी विचारला होता, असे राऊत म्हणाले. एक वर्ष त्यांनी या घोटाळ्यात तक्रार केली. या घोटाळ्यात वाधवान विरोधात तक्रार केली. राकेश वाधवान यांना सोमय्यांनी बॅकमेल केले आणि हजारो कोटींची जमीन ताब्यात घेऊन बिजनेस पार्टनर बनले, असा आरोप राऊत यांनी सोमय्यांवर केला.