धुळे : धुळ्यातील महापालिका निव़डणुकीत भाजपाने मुसंडी मारली आहे, सुरूवातीलाच भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांचा प्रभाव धुळ्यात कमी होताना दिसत आहे. अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या उमेदवारांची चिन्हं एक नसल्यानेही हा फटका बसला असण्याची शक्य़ता व्यक्त केली जात आहे. अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या आघाडीवर आहेत.
धुळ्यात भाजपाने गुंड उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप होत होता, तो उमेदवार देवा सोनार पिछाडीवर आहे, धुळ्यातील जनतेने मतपेटीतून गुंडगिरीला फटकारलं असल्याचं म्हटलं जात आहे. धुळ्यात भाजपा २०, शिवसेना ०३, काँग्रेस ०५, तर राष्ट्रवादी ०८ जागांवर आघाडीवर आहे. अपडेट ११:०४ सकाळी
अहमदनगर : मतदान मशीनची पुजा करणारा उमेदवार श्रीपाद छिंदम २८० मतांनी पिछाडीवर | अपडेट ११.३१ सकाळी
अहमदनगर महापालिका निवडणुकीतही भाजपा १२ जागांवर, शिवसेना ०८ जागांवर, काँग्रेस ०३ तर राष्ट्रवादी ०७ जागांवर आघाडीवर आहे. अपडेट ११:०७ सकाळी
धुळे, अहमदनगर महापालिकांसह राज्यातील इतर नगरपरिषदांचे निकाल हाती येत आहेत. धुळे आणि अहमदनगर महापालिकांची मतमोजणी सकाळी १० ला सुरू झाली आहे. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गोटे यांनी धुळ्यात भाजपाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. एक्सिटपोलच्या निकालावरून कुणाच्याही हातात धुळेकरांनी सत्ता सोपवणार नसल्याची शक्यता आहे.
अहमदनगर : भाजप 2, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 आघाडीवर : अपडेट 10:44
धुळे - भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंचा प्रभाव कमी, भाजपची अनेक ठिकाणी आघाडी | अपडेट 10:49 AM
धुळे - भाजपा गुंडगिरीमुळे चर्चेत असलेला देवा सोनार हा उमेदवार पिछाडीवर, धुळेकरांनी गुंडगिरीला मतपेटीतून फटकारलं | अपडेट 10:47 AM
धुळे : भाजप महापौरपदाच्या उमेदवार उमेदवार शितल नवले आघाडीवर : अपडेट 10:42 AM
धुळ्यात सुरूवातीला टपालातील मतमोजणीला सुरूवात, मतमोजणी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी, कमी मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता 10.23 AM
धुळे - प्रभाग १२ अ च्या उमेदवार फातिमा अन्सारी बिनविरोध विजयी
धुळे महापालिकेत एकूण ७४ जागा आहेत.
प्रभाग १) रंजना धुमाळ भाजप- विजयी, २) ज्योती गायकवाड विजयी, ३) गणेश पाटील, भाजप, विजयी, ४) प्रभाग चंद्रभागा धनगर-राष्ट्रवादी विजयी - अपडेट 10.39 AM