मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदान पार पडताच संपूर्ण देशातील आणि जगभरातील लोकांचं लक्ष एक्झिट पोलवर आहे. कोणाला किती जागा मिळणार? नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. २३ मेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण चित्र तेव्हाच स्पष्ट होईल. पण माध्यमांचा अदाज काय आहे. त्यावरुन निकालाचा शक्यता वर्तवता येऊ शकते.
महाराष्ट्रात युतीला ३४ जागा मिळताना दिसत आहेत. ज्यामध्ये भाजपला २० तर शिवसेनेला १४ जागा मिळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला ५ तर राष्ट्रवादीला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात युतीला ३४ जागा मिळताना दिसत आहेत.https://t.co/754ZWBGSjF#महानिकाल #ExitPoll2019 pic.twitter.com/SDFPhISv87
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
राजस्थानमध्ये भाजपला 22 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला फक्त 3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये भाजपला 22 जागा मिळताना दिसत आहेत.https://t.co/754ZWBGSjF#ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/lbO91pTwXQ
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला 54 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला 4 जागा, सपाला 8 तर बसपाला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेश - भाजप - 54 जागा, काँग्रेसला 4 जागा, सपाला 8 तर बसपाला 13 जागा मिळण्याची शक्यता https://t.co/754ZWBGSjF#ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/Lrkbmwy6SA
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
पश्चिम बंगालमध्ये एनडीएला १९ जागा, यूपीएला ३ जागा तर तृणमुल काँग्रेसला १९ जागा तर इतरांना १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये एनडीएला १८ तर तृणमूल काँग्रेसला ही १८ जागा मिळण्याची शक्यताhttps://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019#ExitPoll2019#महानिकाल pic.twitter.com/fSywyvXI8a
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना धक्का बसताना दिसत आहे. येथे वायएसआर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. टीडीपीला ७, वायएसआर काँग्रेसला १७, भाजपला एकही जागा नाही.
आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना धक्का बसताना दिसत आहे. वायएसआर काँग्रेसला सर्वाधिक जागाhttps://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019 #ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/CfYb1NRorq
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळताना दिसत आहे. भाजपला १६, जेडीयू-एलजेपीला १६, काँग्रेसला ३ , राजदला ४ तर आरएलएसपीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळताना दिसत आहे. https://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019 #ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/7MYcC0fn7m
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
गुजरातमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठं यश मिळतं आहे. पंतप्रधानांच्या राज्यातून भाजपला २२ जागा तर काँग्रेसला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये भाजपला २६ पैकी २२ जागा मिळण्याची शक्यताhttps://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019 #ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/HKxsuvNLxJ
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
कर्नाटकमध्ये भाजपला १८ जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ७ तर जेडीएसला फक्त २ जागा मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये कोणाला किती जागा?https://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019 #ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/088F3v7hcv
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
मध्यप्रदेशात भाजपला १७ जागा तर काँग्रेसला १२ जागा मिळताना दिसत आहेत.
मध्यप्रदेशात कोणाला किती जागा ?https://t.co/754ZWBGSjF#LokSabhaElections2019 #ExitPoll2019 #महानिकाल pic.twitter.com/NEN4XsqPIE
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
ओडिशामध्ये भाजपला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बीजेडीला १४ आणि काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ओडिशामध्ये कोणाला किती जागा?https://t.co/754ZWBGSjF#ExitPoll2019 #LokSabhaElections2019 pic.twitter.com/sm8cZu56UZ
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
तमिळनाडूमध्ये ३८ पैकी भाजपला १ एक, आयएडीएमकेला ५, काँग्रेसला ७ तर डीएमके २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूमध्ये कोणाला किती जागा?https://t.co/754ZWBGSjF#ExitPoll2019 #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3VG8zkZEIY
— Zee 24 Taas (@zee24taasnews) May 19, 2019
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. २०१४ मध्ये एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला 336 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 44 तर युपीएला 58 जागा मिळाल्या होत्या.