मुंबई (राकेश त्रिवेदी) : अवघ्या २०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड तयार करून देणारी टोळी 'झी मीडिया'च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रेल्वेच्या तात्काळ तिकिटावर वेगळ्याच व्यक्तीला पाठवण्याच्या बहाण्याने 'झी मीडिया'च्या टीमनं छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. बांग्लादेशी घुसखोर नकली ओळखपत्र तयार करून देशात वास्तव्य करत असल्याचं समोर आलं होतं. केवळ २००रुपयांमध्ये नकली ओळखपत्र तयार करून देणारी टोळी कार्यरत असल्याचं यामुळे समोर आले आहे.
राज्यात बेकायदा राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात महाराष्ट्र एटीएसने धडक कारवाई सुरू केलीये. गेल्या दोन आठवड्यांमध्ये दोन डझन घुसखोरांना अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याची बनावट ओळखपत्र सापडली आहेत. 'झी मीडिया'च्या टीमने या बनावट ओळखपत्रांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही पोहोचलो मालवणीमध्ये. इथंच काही बांगलादेशींना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.
मालवणीच्या झोपडपट्टीत आम्ही तात्काळ रेल्वे तिकिट बुक करून देणाऱ्या एजंटला भेटलो. त्याला मुंबई-दिल्ली स्लिपर कोचचं तिकिट काढायला सांगितलं. २०० रुपये आगाऊ दिले. दुस-या दिवशी उरलेली ८०० रुपयांची रक्कम अदा करून आम्ही तिकिट घेतलं. हे तिकीट नीट बघा. बांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेसचं हे तिकिट राजेश कुमार यांच्या नावे बुक करण्यात आलंय. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही पुन्हा त्या एजंटला भेटलो. त्याला सांगितलं की, राजेश कुमार याला काही कारणानं मुंबईतच राहणं आवश्यक आहे. ॉ
पण एकानं कुणीतही दिल्लीला जाणंही गरजेचं आहे. त्यामुळे राजेश कुमार नावाचं खोटं ओळखपत्र देऊन दुसऱ्याला पाठवणं शक्य आहे का, असं आम्ही या एजंटला विचारलं. त्यावर २०० रुपये आणखी दिले, तर हे शक्य असल्याचं त्या एजंटनं सांगितलं. ज्या व्यक्तीला दिल्लीला पाठवायचंय, त्याचं खरं ओळखपत्र या एजंटनं मागितले. त्यानंतर झालेला संवाद तुम्ही प्रत्यक्षच ऐका.
एजंट 1 - ओरिजिनल मै आप को कल दुंगा
रिपोर्टर - कल ?
एजंट 1 - ओरिजिनल और डुप्लीकेट दोनों ही मैं आपको कल दूंगा
रिपोर्टर - अगर कुछ दे देते तोह मैं घर पे ही देके जाता मैं
एजंट 1 - आपका सिर्फ फोटो है ?
रिपोर्टर - फोटो ?
एजंट1 - एक काम करो ना कल आप आओगे ना जब 12 बजे , नहीं तो मैं एक काम करता हु रात को आराम से आपके घर पंहुचा दू ? चलेगा आपको ?
रिपोर्टर - एक काम कीजिये आप मुझे कल ही दीजिये।
एजंट 1 - सुबह तुम आजाओ 11 बजे तक
रिपोर्टर - ट्रैन कितने बजे की है ?
एजंट 1 - ट्रैन तो 4:35 का बांद्रा से है
रिपोर्टर - बांद्रा से ?
एजंट1 - बांद्रा से बोरीवली से आएगा 5 बजे।
एजंट 2 - अभी आपका आधार कार्ड कब लाके दोगे आप ?
रिपोर्टर - मैं इनके थ्रू से भेज दूंगा
एजंट 2 - अभी भिजवा दोगे ना ? क्यूंकि तुम्हारे आधार कार्ड के बिना नहीं हो पायेगा।
रिपोर्टर - इनको मैं लेके जाऊंगा तो मैं इनके थ्रू से कर सकता हूँ लेकिन मुझे लग रहा है कि कहाँ रखा है यार मैंने .....
एजंट 2 - क्यूंकि आपका आधार कार्ड मिल जाए ना तो भी काम हो जायेगा
रिपोर्टर - देखिये ना आधार कार्ड अगर अभी बन जाए तो क्यूंकि सुबह बहुत लेट हो जाएगा, 4 बजे की गाडी बता रहे हैं तो क्या करूँगा मैं। अभी 5 मिनट में हो जायेगा बोल रहे हैं आधार कार्ड।
एजंट 2 - 5 मिनट नहीं आधा घंटा जाएगा। 1 घंटा पकड़ लो ये बनवाके आ जाएगा जाके।
रिपोर्टर - पैसा दिया न मैंने आपको
एजंट1 - हाँ
एजंट1 - ठीक है फिर आपके आधार कार्ड के बिना ही इनका बना देता हूँ फिर,
रिपोर्टर - नाम वाम या टिकट कुछ चाहिए ?
एजंट - टिकट आपके पास ही रखो। मुझे टिकट सिर्फ एक मिनट के लिए दे दो। देख नाम क्या लिखना मालूम - राजेश कुमार 30 साल ! इसी आधार कार्ड पे @#@# (not audible) करना। समझा ?
एजंट 2 - हाँ समझ गया
एजंट 1 - सिर्फ नाम और ऐज एक्सचेंज करना है।
एजंट 2 - एड्रेस ये ही रहने दू
रिपोर्टर - सब वही
एजंट - सब वही रहने दे, पूरा डिटेल ..... सबकुछ सेम रहेगा सिर्फ नाम चेंज कर देना।
एजंट 2 - भाई इसको मिसयूज मत करना,
एजंट1 - ये आधार कार्ड भाई ट्रेवल होते ही फेंक देना।
रिपोर्टर - ज़रूर!
एजंट - कैसे भी फेंक देना लेकिन फेंक देना, जला-वला के कुछ। क्यूंकि आधार कार्ड के मामले में थोड़ा गवर्नमेंट टाइट है।)
हा संवाद झाल्यानंतर तिस-याच दिवशी गाडी सुटायला काही तास शिल्लक असताना आम्हाला कृष्ण सिंग यांचं मुळ आधार कार्ड आणि राजेश कुमार नावानं बनावट आधार कार्ड देण्यात आलं. ही दोन्ही आधारकार्ड नीट बघा. एक आहे कृष्ण मुरारी सिंग यांचं खरं कार्ड. आणि या दुसऱ्या कार्डवर फोटो, जन्मतारीख, पत्ता कृष्ण मुरारी सिंग यांचाच आहे, नाव मात्र आहे राजेश सिंग.
केवळ २०० रुपयांमध्ये आम्ही हे नकली आधारकार्ड तयार करून घेतलंय. एकीकडे प्रत्येक गोष्टीसाठी आधार सक्ती केली जात असताना असं नकली आधारकार्ड तयार करून देशाच्या नागरिकत्वाचं खोटं प्रमाणपत्र मिळवणं किती स्वस्त आहे, तुम्हीच बघा... अशीच नकली आधार कार्ड तयार करून बांगलादेशी घुसखोर इथं राहतात आणि देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखण्यासाठी हे बनावट ओळखपत्रांचं रॅकेट आधी उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे.