कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी काढलेला लोकसंघर्ष मोर्चा आता मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचलायं. हजारोंच्या संख्येने पहाटेच हा मोर्चा निघालायं. एकाच दिशेने वाहतूक सुरू असल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी टळली आहे. थोड्याच वेळात एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटून मागण्यांवर चर्चा होणार आहे. मोर्चातील शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेंनी सोमय्या मैदानात भेट घेतली. मुंबईत दिवसा होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मोर्चेकरी सकाळी साडे चार वाजताच आझाद मैदानाकडे निघाले.
पोलिसांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मोर्चासाठी ठाण्याकडे येणाऱ्या वाहतूकीची एक मार्गिका खुली केलीय.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात
वनजमिनी आदिवासींच्या नावावर
दुष्काळी भागात तातडीने मदत
यापू्र्वी मार्चमध्ये नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला होता. पण त्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत. आता तर सरकार या मागण्यांवर विचार करेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे.