राज्यातून कुणामुळे गेला चौथा प्रकल्प? एअरबसचा महाराष्ट्राला 'टाटा', गुजरातला 'केम छो'

गुजरातचा महाराष्ट्रावर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्रातून चौथा प्रकल्प गुजरातमध्ये  

Updated: Oct 28, 2022, 06:32 PM IST
राज्यातून कुणामुळे गेला चौथा प्रकल्प? एअरबसचा महाराष्ट्राला 'टाटा', गुजरातला 'केम छो'  title=

Maharashtr Politics : वेदांता- फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), बल्क ड्रग्ज पार्क (Bulk Drug Park) आणि मेडिसीन डिव्हाईस पार्क (Medical Device Park) पाठोपाठ आता नागपुरात होऊ घातलेला टाटा एअरबसचा (Tata Airbus Project) 22 हजार कोटींचा संरक्षण सामुग्राची प्रकल्पही गुजरातला गेलाय. त्यामुळे उद्योगांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शिंद-फडणवीस सरकारची (Shinde-Fadanvis Government) चांगलीच कोंडी झालीय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नागपुरातून हा प्रकल्प गेल्यामुळे मविआ (Mahavikas Aghadi) आणि ठाकरेंच्या हातात सरकारवर निशाणा साधण्यासाठी आयतं कोलित मिळालंय. खोके सरकारवर उद्योजकांचाही विश्वास उरलेला नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केलीय. 

तर हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं खापर शिंदे सरकारचे (Shinde Government) उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे सरकारवर फोडलंय. ठाकरे सरकारच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप सामंतांनी केलाय. पुढच्या वर्षी आणखी मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं आश्वासन द्यायलाही सामंत विसरले नाहीत.

शिंदे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर गेल्यावरून वादाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 

किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले? 

वेदांता फॉक्सकॉन
1 लाख 54 हजार कोटी रुपये

बल्क ड्रग्ज पार्क
30 हजार कोटी रुपये

मेडिसीन डिव्हाईस पार्क
424 कोटी रुपये

हे प्रकल्प परराज्यात गेल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय. एकीकडे शिंदे गटातल्या आमदारांची नाराजी उफाळून येतेय तर दुसरीकडे मोठी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जात असल्याचे आरोप होत आहेत. विशेष म्हणजे राज्यातले प्रकल्प मोदींच्या गुजरातमध्ये जात असल्यानं शिंदे-फडणवीस सरकारची अधिकच डोकेदुखी वाढलीय. आता शिंदे सरकार ही कोंडी कशी फोडणार आणि याची भरपाई कशी करणार याकडे महाराष्ट्राचं  लक्ष लागलंय.