मुंबई : देशात सोने-चांदीच्या दागिन्यांना लग्न समारंभ, अन्य विध, तसेच गुंतवणूकीसाठी मोठे महत्व आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक आणि सोने खरेदी होत असते.
संपूर्ण देशातील विविध घटनांचा परिणाम सोन्याच्या भावावर होत असतो. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी - पुरवठ्यावरही अवलंबून असतात.
गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केमध्येही कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती.
आजही देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्याकडे वळले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
फेब्रुवारी मार्च 2021 मध्ये सोने 43 हजार 700 पर्यंत घसरले होते. तेच काल म्हणजेच 19 एप्रिल रोज 49 हजार प्रतितोळा इतके वाढले होते.
आज मुंबईतील सोन्याचा भाव 48 हजार 820 रुपये प्रतितोळा इतका आहे. काल पेक्षा कमी असला तरी 1-2 महिन्यांतील किंमतीपेक्षा हा भाव जास्तच आहे. सोमवारी सोन्याचा भाव 49 हजार प्रतितोळा इतका होता.
तसे पाहता गेल्यावर्षी ऑगस्टदरम्यान, सोन्याचे दर 55 हजारांवर गेले होते. त्याच्या तुलनेत आजही सोने स्वस्त मिळत आहे. असेच म्हणता येईल.