मुंबई : हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू झालेला आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
एक पावसाळी सकाळ मुंबईत...
24/48 तासात मुंबई आणी किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता.
उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठ वाडा च्या काही भागात जोरदार सरींची शक्यता. pic.twitter.com/k18AEpYwdu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 30, 2020
24/48 तासात मुंबई आणी किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठ वाडा च्या काही भागात जोरदार सरींची शक्यता, असल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होशाळीकर यांनी ट्विटर अकाऊंटवरून दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. पण आता श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा पाऊसाचा जोर वाढणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊसाची हजेरी लागणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. पण आता श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा पाऊसाचा जोर वाढणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊसाची हजेरी लागणार आहे.