मुंबई : ऑक्टोबर हीटच्या झळांमध्ये मुंबईकर अक्षशः होरपळून निघतायत. तापमानचा पारा काल दशकातल्या सर्वोच्च पातळीवर होता. पुढचे काही दिवस उन्हाची काहिली अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं म्हटलं आहे. रविवारी दिवसा मुंबई उपनगरातील तापमान ३७.८ अंशांपर्यंत चढलं.
गेल्या दहा वर्षातलं हे दुसरं सर्वाधिक तापमान होतं. पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. २०१५ मध्ये तापमान 38.6 अंश नोंदवण्यात आलं होतं. हेच आतापर्यंतचं मुंबईतलं सर्वोच्च तापमान आहे.
ऑक्टोबर महिन्यात तापमान हे 33 डिग्री सेल्सियस पर्यंत असतं तर रात्री 20 डिग्री सेल्सियस पर्यंत असतं. पण यंदा ऑक्टोबरमध्ये तापमान खूप अधिक वाढलं आहे. 12 ऑक्टोबरनंतर थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अशा वातावरणात मोठ्या प्रणातात आजार बळावतात. ऑक्टोबरमध्ये जेथे थंडीची सुरुवात होते यावर्षी मात्र उन्हाचा सामना करावा लागतोय. सर्दी, ताप, टाईफाइड सारखे आजार अशा वातावरणात होण्याची शक्यता असते.