नवी दिल्ली : आयएनएस खांदेरीच्या समावेशामुळे नौदलाची ताकद कशी वाढली आहे ते पाकिस्तानला हे समजले पाहीजे असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. मुंबईत आयएनएस खांदेरीच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. पाकिस्तानचे प्रमुख इथून तिकडे जात त्यांनी कार्टुनिस्टला एक नवीन संधी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यूएनमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. इम्रान खान यांनी इथे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. याला भारतातर्फे जशासं तसे उत्तर देण्यात आले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या कार्याचे कौतूक केले. शिवाजी महाराजांचे समुद्रावरील वर्चस्वाचे राखण्याचे स्वप्न हे नौदल साकारत आहे.
मात्र काही लोकं आजही समुद्रमार्गे हल्ला करण्याचा विचार करत आहेत. 26/11 प्रमाणे हल्ला करण्याचे काहींचे मनसुबे आहेत मात्र आम्ही हे होऊ देणार नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
संयुक्त राष्ट्र महासभेत इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमधून कर्फ्यू हटल्यानंतर इथे रक्तपात होईल. इम्रान खान यांच्या भाषणाआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाहून जगाला शांतीचा संदेश दिला.
यूएनमध्ये पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या भडकाऊ भाषणाला भारताच्या विदिशा मैत्रा यांनी 'राइट टू रिप्लाय' प्रावधानाचा वापर करत तात्काळ उत्तर दिले आहे. पाकिस्तानने यूएनमध्ये दहशतवादाला योग्य ठरवले. जगातील सर्वात मोठ्या मंचाचा पाकिस्तानने दुरुपयोग केला. पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो. इथे १३० दहशतवाद्यांना पेंशन दिली जाते. इम्रान खान यांचे भाषण द्वेषाने भरलेले होते. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहे, असे उत्तर मैत्रा यांनी आपल्या भाषणातून दिले.