Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया

अवघ्या दोन मिनिटांत जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रत्येक पायरी 

Updated: Aug 30, 2022, 08:23 AM IST
Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया  title=
how to register for mhada dream home lottery online process details

Mhada Lottery : सर्वांना आपलंसं करणाऱ्या आणि अनेकांची कर्मभूमी असणाऱ्या मुंबई शहरात (Mumbai Housing) हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न (dream home). अर्थात हे स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक पाठबळाची पूर्तताही तितकीच महत्त्वाची. पण, सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करुन देत त्या अनुषंगानं म्हाडाकडून घरांची सोडत काढली जाते. 

यंदाच्या वर्षी दिवाळीच्या (Diwali 2022) मुहूर्तावर म्हाडा चार हजार घरांची सोडत काढणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. मागील तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणारे मुंबईकर या सोडतीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. (how to register for mhada dream home lottery process details )

घरांची सोडत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण, (mhada lottery 2022) म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच आता बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसारच यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन (Online Process) असेल.

इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रं ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रियाच येथे नसेल. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच या सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. 

वाचा : सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; दूध मोठ्या फरकानं महागलं

महत्त्वाची बाब अशी, की पात्रता आधीच निश्चित झाल्यानं विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणारेय. सोडत प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नव्या पद्धतीमुळे सोडत 100 टक्के पारदर्शक होईल, असा दावा करण्यात येत आहे.

सदरील प्रस्ताव (Mhada) मुंबई मंडळानं म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडाकडून नवीन सॉफ्टवेअरही तयार करण्यात येत आहे. या प्रणालीची चाचणी (IIT) आयआयटीकडून केली जाणार असल्याचं कळत आहे. अर्जदारांना सोप्या पद्धतीनं अर्ज भरता यावा यादृष्टीनं या प्रणालीची रचना असेल.