महाराष्ट्रातील तरूण तरूणींना इंदुरीकरांची 'नक्कल' करण्याचं 'येड लागलं'

आमक्या-तमक्या अभिनेत्याचं तरूण-तरूणींना वेड लागलंय, त्याची क्रेझ तरूण-तरूणींमध्ये आहे, असं म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल. पण...

Updated: Jul 18, 2018, 02:15 PM IST

मुंबई : आमक्या-तमक्या अभिनेत्याचं तरूण-तरूणींना वेड लागलंय, त्याची क्रेझ तरूण-तरूणींमध्ये आहे, असं म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल. 'क्रेझ' म्हणजे 'वेड' लागणं, अस्सल ग्रामीण भाषेत 'येड' लागणं. पण आता आख्ख्या महाराष्ट्रातील तरूण तरूणींना कीर्तनकाराच्या स्टाईलने 'येड लागलंय', इंदुरीकरांची ही स्टाईल तरूण-तरूणींना खूप भावतेय. कदाचित देशात हे पहिल्यांदाच घडत असेल की युवा पिढी एका कीर्तनकाराच्या स्टाईलला फॉलो करतेय.( किती मुलांनी आणि कशी मिमिक्री केली आहे, याचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

इंदुरीकर व्हिडीओ होतात सर्वात जास्त सर्च

फक्त तरूण तरूणीचं नाहीत, तर इंदुरीकरांना महाराष्ट्रातून दररोज ४० लाख लोक यूट्यूबवर पाहतात. त्यात ३० ते ३५, ४० ते ५५ वयोगटातील लोक सुद्धा आहेत. इंदुरीकर व्हिडीओ, नावाचे सर्च रोज मोठ्या प्रमाणात यूट्यूबवर होतात, इंदुरीकर यांचा व्हिडीओ सरासरी सलग ५ ते १५ मिनिटं पाहिला जातो.

खालील व्हिडीओ पाहिल्यावर कळणार इंदुरीकरांची क्रेझ

इंदुरीकरांच्या स्टाईलचे मुलांनी शेकडो व्हिडीओ यूट्यूबवर टाकले आहेत. खाली आम्ही एक व्हिडीओ या बातमीसोबत देत आहोत. यात तुम्ही पाहा इंदुरीकरांची तरूणांमध्ये काय क्रेझ आहे.