मुंबई : ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा वन्यजीव सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो. वन्यप्रेणी या दरम्यान प्राण्यांविषयीची विविध माहिती समोर आणत असतात. पॉज म्हणजेच प्लांट अँड एनिमल वेल्फेयर सोसायटी काम करत आहे. जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्त मुक्या भटक्या प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या पॉज या संस्थेने तब्बल २० वर्षात उल्लेखनिय कामगिरी केली.
पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी २० वर्षात सुमारे ३६ हजार वन्य जीवनांना जीवदान दिले आहे.कुठे विहिरीत मांजर पडले आहे.रस्त्यावर कुत्रा जखमी पडला आहे, कुठे घोरपड आढळून आली आहे. तर कुठे पक्षाच्या गळ्य़ात पतंगाचा मांजा अडकला आहे. मोर जखमी झाला आहे. या विविध प्रकरणात संस्थेला कॉल येतो.
कधी भुकेमुळे, कधी अपघातामुळे, कधी गंभीर आजार जडल्यामुळे तर कधी काही जणांकडून मिळालेल्या क्रूर वागणुकीमुळे या मुक्या प्राण्यांचे अक्षरशः हाल होतात. अशा भटक्या प्राण्यांसाठी काही नागरिक, संस्था कार्यरत आहेत.
भटके मुके प्राणी आणि निसर्गामधील सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी वर्ल्ड एनिमलडे दिवस जगभर साजरा केला जातो. काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मुक्या प्राण्यांना दिवसभरात खायलाही मिळत नाही.
त्यामध्ये साप, पक्षी, माकडे, कोल्हे, कासवे तर त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे प्राणी मित्र निलेश भणगे यांनी दिली.