वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबेला पोलीस कोठडी

या दिवसापर्यंत असणार त्याची पोलीस कोठडी   

Updated: Apr 15, 2020, 04:09 PM IST
वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबेला पोलीस कोठडी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavitus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील Lockdown लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवत असल्याचं मंगळवारी जाहीर केलं. त्यानंतर दुपारी वांद्रे स्थानकावर परराज्यातील हजारो मजुरांनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या राज्यात जाण्यासाठी ही गर्दी येथे जमल्याचं सांगण्यात आलं. 

लॉकडाऊन सुरु असतानात इतक्या लोकांचं एकत्र येणं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्तेचा धक्का लागणं ही बाब अनेक प्रश्नांना वाचा फोडून गेली. त्याचदरम्यान, याप्रकरणी जमावाला भडकवल्याप्रकरणी विनय दुबे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. ज्यानंतर त्याला ताब्यात घेत पोलीस कोठडी सुवानण्यात आली आहे. 

वांद्रे पोलीस ठाण्यात गर्दी उसळल्याप्रकरणी तीन वेगवेगळे गुम्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यातील एका प्रकरणात विनय दुबे याला २१ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी पोलीसांचा तपास अद्याप सुरुच आहे. 

 

विनय दुबेने असं काय केलं होतं? 

विनय दुबे याने फेसबुक लाईव्ह करत उत्तर भारतीयांसाठी मजदूर आंदोलनाची हाक दिली होती. परराज्यातील कामगार, मजुरांना आपआपल्या राज्यात पाठविण्यासाठी पायी जाणार असल्याचे त्याने म्हटले होते. यासाठी प्रत्येकाची माहिती व्हॉट्सएपवर पाठवण्याचे आवाहन देखील त्यानं केलं होतं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलनाची जाहीर केल्यानंतर  नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं.