मुंबई : राज्यासाठी एक चांगली बातमी. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबईसाठीही दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतही आज सर्वात कमी रुग्णसंख्या दिसून आली आहे. (Coronavirus in Mumbai) मुंबईत प्रथमच नवीन 530 रुग्ण सापडले आहे. तर राज्यात कोरोनाचे 8 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Coronavirus latest updates) आज दिवसभरात 200 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात प्रथमच कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात8 हजार 129 नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. दरम्यान, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून जास्त आहे.
राज्यात आज 200 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. तर राज्यातील मृत्यूदर 1.9 टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 54 हजार तीन रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, राज्यात रविवारपर्यंत 2 कोटी 59 लाख 09 हजार 078 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 13 जून 2021 रोजी 88,134 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
मुंबई लेव्हल 1वर आल्याशिवाय सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार नाही, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबई सध्या लेव्हल तीन वर आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जास्त काळजी घेतली जात असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे लोकलमधून प्रवासासाठी मुंबई आणि एमएमआर रिजनमधील नागरिकांना अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, यामुळे बससेवा आणि रस्तेवाहतुकीवर मोठा ताणही येणार आहे.