Maharashtra APMC Election 2023 : बाजार समितीच्या आतापर्यंतच्या निकालात 9 ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर, 4 बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे. 147 पैकी 14 बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहे.
दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसलाय तिथं मविआची सत्ता आलीय. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआची विजयी झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री आमदार अशोक उईके यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांना फक्त 4 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट युतीने आपला गड कायम ठेवला आहे. तब्बल अकरा जागा जिंकित महाविकास आघाडीने भाजप शिवसेना युतीला धोबीपछाड दिला आहे. भाजपचे माजी मंत्री मदन येरावार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात युतीने मविआ पुढे सर्व शक्ती पणाला लावून आव्हान उभे केले होते. परंतु भाजप शिवसेना युतीला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले. तर तीन जागावर अपक्षांनी विजय मिळविला.
शेतकरी विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनलला 9-9 मत मिळाली. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचे शेतकरी पॅनल आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात चिठ्ठी पद्धतीने सभापतीची निवड करावी लागणार. दोन्ही पॅनलच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी केला गुलाल उधळत जल्लोष साजरा
मराठवाड्यातील सर्वात बहुचर्चित लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. काँग्रेस पक्षानी या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला आहे. आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी या निवडणुकीत मोर्चे बांधणी केली होती.भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी मोठ या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस समोर मोठं आव्हान निर्माण केल होत.18 पैकी 18 जागा मिळवत एक हाती सत्ता खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाने लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती वरची सत्ता अबाधित ठेवली आहे. या अगोदरच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपला 3 जागेवर समाधान मानावं लागलं होतं. पण आता या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला आहे.
राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता आली आहे. तनपूरे गटाचा दणदणीत विजय झाला आहे. 18 पैकी 16 जागा जिंकत विजय मिळवला. विखे आणी कर्डिले गटाचा पराभव झाला आहे. विखे पाटलांनी तनपूरेंना आव्हान दिले होते. तनपूरे गटाने विखे कर्डिले गटाचा पराभव केला आहे. 20 वर्षांपासून तनपूरे गटाची राहुरी बाजार समितीवर एकहाती सत्ता आहे. विखे कर्डीले गटाचे सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य आले निवडून आले आहेत.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती वर भाजपचे वर्चस्व पहा.ला मिळाले. सर्व 18 जागा भाजपने जिंकल्या आहेत. मंगळवेढा कृषी बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच जागांसाठी आज मतदान झाले. आमदार समाधान आवताडे आणि बबनराव आवताडे यांच्या समोर काही जणांनी एकत्र येत आघाडी केली होती. मात्र त्यांचा टिकाव लागला नाही. मतदान झालेल्या पाच जागा वरही आमदार आवताडे समर्थक विजयी झाले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीन झेंडा फडकवला. वर्धा, सेलू, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा दणकून पराभव झाला. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला खातही उघडता आल नाही. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला तीन जागा मिळाल्या. अन्य बाजार समितीत मात्र भाजपचा दणकून पराभव झाला. हा जनतेचा कौल असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केली.