Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झिनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीचा सर्वात अचूक AI एक्झिट पोल फक्त झी 24 तासने दाखवले होते. आता झी 24 तास घेऊन आलाय महाराष्ट्र विधानसभेचा महा AI सर्व्हे पार्ट 1. लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे. तेव्हा महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं सरकार येणार? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार का ? मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला मिळणार? जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर देणारा महा AI सर्व्हे झिनियाने सादर केला आहे. महाराष्ट्राच्या महा AI सर्व्हेत राज्यातल्या लाखो लोकांचा कौल घेण्यात आलाय. झी २४ तासच्या AI सर्व्हेच्या डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वोत मोठा मुद्दा कोणता?
आज राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यास महायुती सरकार येणार अशी पसंती राज्यातल्या 47 टक्के जनतेने दिलीय.. लोकसभा निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता झी 24 तासच्या या महा AI सर्व्हेमध्ये महायुतीला कौल दिसतोय. त्याचबरोबर राज्यातील निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता? याप्रश्नावर लोकांनी विकासच्या मुद्द्याला सर्वाधिक कौल दिला आहे. 25 टक्के लोकांना विकास हवा आहे. तर कल्याकारी योजनांचा मुद्दा 20 टक्के लोकांना योग्य वाटतोय.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीताल सर्वात मोठा मुद्दा ठरेल असं 10 टक्के लोकांना वाटतंय. तर बेरोजगारीच्या मुद्यावर 15 ट्केक लोकांनी कौल दिला आहे. भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावर प्रत्येकी 15 टक्के लोकांनी मतं दिली आहेत.
राज्यातील कोणत्या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकते का असा सवाल आम्ही राज्यातील जनतेला विचारला त्यावर लोकांनी काय मतं मांडली भाजपला 38 टक्के लोकांनी पसंती दिलीय. शिवसेना शिंदे गटाला 22 टक्के लोकांनी कौल दिलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं 17 टक्के मतं व्यक्त केलीय. तर काँग्रेस पक्षाला केवळ 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9 टक्के लोकांनी पसंती दिलीय