मुंबई : कोरोनाने राज्यात (Maharashtra Corona Update) हाहाकार माजवला आहे. राज्यात आज (16 जून) यंदाच्या वर्षातील विक्रमी रुग्णवाढ झाली आहे. नेहणीप्रमाणे राज्यातून मुंबईत सर्वाधिक रुग्णांचं निदान झालंय. बीए .5 या नव्या व्हेरिएंटचे रुग्णही आढळले आहेत. तर सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेला आहे. (maharashtra corona update 16 june 2022 today record outbreak in year 4 thousand 255 patients found in state active over 20 thousand)
राज्यात यंदाच्या वर्षातली विक्रमी कोरोना रूग्णवाढ झाली आहे. दिवसभरात 4 हजार 255 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. तसेच नव्या व्हेरियंट BA.5 ची दोघांना लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा हा 20 हजार पार गेलाय. राज्यात सध्या 20,634 जणांवर रुग्णांवर कोरोना उपचार सुरु आहेत.
गुरुवार 16 जून : 4 हजार 255
बुधवार 15 जून : 4 हजार 24
मंगळवार 14 जून : 2 हजार 956
सोमवार 13 जून : 1 हजार 885
रविवार 12 जून : 2 हजार 946
शनिवार 11 जून : 2 हजार 922
शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81