मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार

दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 20, 2020, 04:24 PM IST
मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार  title=

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने दिल्ली ते मुंबई दरम्यान विमान सेवा (Flight) आणि रेल्वे सेवा (Train) बंद करण्याचा विचार करीत आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्या वाढल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दररोज होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संबंधित राज्य सरकार कोरोना संक्रमण मोडण्यासाठी विमान सेवा आणि रेल्वे सेवेवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता सर्व एजन्सी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आदेश जारी होतील, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आधी २३ नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीपर्यंत वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळा सुरु होणार होत्या. परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनाने खबरदारी घेत शाळा सुरु करण्याचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकला आहे. यासंदर्भात लवकरच महापालिका नवीन आदेश जारी करणार आहे.
 
दिवाळीत लोकांचा एकमेकांशी वाढलेला संपर्क पाहता कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. हेच विचारात घेऊन मुंबई महापालिकेनं कोरोना टेस्ट ड्राईव्ह सुरू केला आहे. दिवाळीत सर्वाधिक लोकांशी संपर्क झालेले दुकानदार, तिथले कर्मचारी आणि फेरीवाल्यांचा समावेश आहे. त्यामुळं या व्यक्तींच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. याकरिता प्रत्येक दुकानात आरोग्य विभागाचे कर्मचारी जावून त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगत आहेत.