मुंबई : स्वप्नांची पूर्तता (dream home) ज्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीशी जोडलेली असते, ती म्हणजे हक्काचं घर घेणं. मेहनतीच्या कमाईच्या बळावर स्वत:चं घर खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, ही इच्छा पूर्ण करताना त्याची संपूर्ण प्रक्रिया थकवणारी असते. (property ) घर शोधण्यापासून त्याची किंमत पाहता आर्थिक जुळवाजुळव, त्यानंतर घराची सजावट, कागदोपत्री व्यवहार या सर्व गोष्टींचा समतोल साधताना तारांबळ उडते. इथं महत्त्वाचा मुद्दा असा, की एकही गोष्ट हातची निसटली तर सर्व गणितं चुकतात आणि मग वाट्याला येतो तो मनस्ताप.
आता मात्र तुमच्या डोक्यावर असणारा हा भार काहीसा हलका होणार आहे. कारण, नवं घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलीये. आता (Builder) बिल्डरच्या ऑफिसमध्येच नव्या घराचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. (maharashtra new rule property e registration agreements can be possible from builders office)
महाराष्ट्रात लवकरच प्रॉपर्टी ई रजिस्ट्रेशनची (property e registration ) सुरूवात होणार आहे. यामुळे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभे राहा, वाट पाहा ही कटकट संपणार आहे. नवे घर घेणाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळेल. ई रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित असेल ही बाबही तितकीच महत्त्वाची.
(Maharashtra Property registration) महाराष्ट्रात रजिस्ट्रेशनसाठी किती पैसे आकारले जातात?
राज्यात शहरी भागांमध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन चार्ज 5 टक्के इतका आहे. तर, ग्रामीण भागांमध्ये प्रॉपर्टी स्टॅम्प ड्यूटी 3 टक्के इतकी आहे.