मुंबई : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहेत. राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यात येणार आहे. ही मेगाभरती असणार आहे. तब्बल 20 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी विशेष करुन पोलिसांत भरती (Government Job) होण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उपमुख्यंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. (maharashtra police recruitment 20 thousand police will be recruited in state home minister devendra fadnavis big announcement)
राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ठराविक काही दिवसांनी गृहमंत्र्यांची बैठक होत असते. या बैठकीत उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतात. फडणवीस यांच्यासह ही महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर फडणवीस यांनी 20 हजार पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली.
सध्या जमाना डीजीटलचा आहे. जवळपास सर्वच कामं ही ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे सायबर सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आतापर्यंत अनेकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. तसेच महत्त्वाचे कागदपत्र ही लीक होतात. त्यामुळे फडणवीस यांनी हा मुद्दा लक्षात घेत सायबर सुरक्षेवर अधिक भर देणार असल्याचं सांगितलं. तसेच या बैठकीत सायबर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चर्चा झाली. सोबतच यासाठी एक मोहीम राबवणार आहोत, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.