Maharashtra Politics: थोड्याच वेळात मुंबईत वज्रमुठ सभा; महाविकासआघाडी करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे या सभेला उपस्थित राहतात की नाही, याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. मैदानावर तिन्ही पक्षांचे झेंडे, नेत्यांचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र, चर्चा आहे ती अजित पवार यांच्या नावाचीच आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 1, 2023, 05:43 PM IST
Maharashtra Politics: थोड्याच वेळात मुंबईत वज्रमुठ सभा; महाविकासआघाडी करणार जोरदार शक्तीप्रदर्शन title=

Mahavikas Aghadi Vajramuth Sabha:  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मविआच्या सभेत शरीराने असतील, ते मनातून कुठे आहेत हे 4 दिवसात कळेल अस वक्तव्य करत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खळबळ उडवून दिली आहे. शिरसाट यांच्या या सूचक विधानामुळे महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेकजडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कारण, आता अजित पवार या सभेला उपस्थित राहणार का? उपस्थित राहिले तर अजित पवार भाषण करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अजित पवार या सभेत भाषण करणार आहेत. 

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे या सभेला उपस्थित राहतात की नाही, याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. मैदानावर तिन्ही पक्षांचे झेंडे, नेत्यांचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र, चर्चा आहे ती अजित पवार यांच्या नावाचीच आहे. 

राष्ट्रवादीकडून कोण भाषण करणार?

मुंबईत होत असलेल्या वज्रमूठ सभेत राष्ट्रवादीकडून भाषण कोण करणार याची उत्सुकता अजून कायम आहे. जितेंद्र आव्हाड यांचं नाव पक्क असलं तरी दुस-या नावावर अंतिम निर्णय झालेला नाही. अजित पवार, जयंत पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यापैकी एकजण भाषण करतील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली होती. पक्षांतर्गत चर्चेनंतर नाव ठरेल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. अखेरीस अजित पवार हे सभेत भाषण करणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे. 

उद्धव ठाकरे चर्चेत

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आधीच हजर होते. मात्र, उद्धव ठाकरे उशीरा आले. स्टेजवरील बॅनरवर मध्यभागी उद्धव ठाकरेंचा मोठा फोटो लावण्यात आला होता. तर, इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यासोबतच भाषणासाठी उभे राहताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सभेत सर्व नेत्यांनी अगदी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील आपलं भाषण लवकर आवरत घेतले होते. मात्र, अखेरचं मुख्य भाषण आणि अधिकचा वेळ उद्धव ठाकरेंना देण्यात आला. सभेत ठाकरेंना स्पेशल ट्रिटमेंटमुळे मविआचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा रंगली होती.