केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून ३५ लाखांचा औषधसाठा

लवकरच ३५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा औषधांचा साठा केरळला रवाना होईल. 

Updated: Aug 25, 2018, 05:08 PM IST
केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून ३५ लाखांचा औषधसाठा title=

मुंबई: महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. येथील पूरग्रस्तांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, याची खबरदारी अन्न आणि औषध प्रशासन घेत आहे. 
 
लवकरच ३५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा औषधांचा साठा केरळला रवाना होईल. पुण्यातील केमिस्ट असोसिएनशने यासाठी मदत केली आहे, अशी माहिती अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

तत्पूर्वी शनिवारी केरळमधील कोडगू जिल्ह्याच्या सरकारी पाहणीच्यावेळी भाजपच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन शनिवारी कोडगू जिल्ह्याची पाहणी करायला गेल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री महेश यांच्याशी वाद झाला. महेश यांनी सितारमन यांना वेळेअभावी पत्रकार परिषद आटोपती घेण्यासाठी सांगितले. तेव्हा सितारमन यांना राग अनावर झाला.

सितारामन यांनी मंत्री महेश यांच्याकडे कटाक्ष टाकून, 'मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुमच्या सूचनांचे पालन करत असल्याचे म्हटले.  जिल्हा प्रशासनाने जे वेळापत्रक ठरवून दिले आहे, त्यानुसारच ही पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगत सितारामन यांनी आपला संताप व्यक्त केला.