मराठी भाषा दिवस : ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू

मराठी भाषा दिवस ' विधिमंडळच्या प्रांगणात  साजरा केला गेला. पण या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू झाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2018, 03:26 PM IST
मराठी भाषा दिवस :  ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू  title=

मुंबई : मराठी भाषा दिवस ' विधिमंडळच्या प्रांगणात  साजरा केला गेला. पण या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू झाली. 

खरपूस समाचार

मराठी अभिमान गीताचं सामूहिक गायन ऐन रंगात आलेलं असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणेत बिघाड झाला. तो शेवटपर्यंत दुरुस्त होऊ शकला नाही. त्यानंतर विधानसभेत कामकाज सुरू झाल्यावर अजित पवारांनी सरकारनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. 

मराठी भाषेचा अपमान

मराठी भाषा गौरव दिनी सुरेश भट यांचे मराठी गीत गायले गेले. हे गीत सात कडव्यांचे आहे. मात्र सरकारने आज जे गीत गाण्यासाठी छापले होते त्यातले शेवटचे कडवे गाळण्यात आले. सात कडव्यांचे गाणे असताना सहा कडवी छापली आणि गायली गेली. हा मराठी भाषेचा आणि सुरेश भट यांचा अपमान आहे, असा संताप पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीचा खेळखंडोबा

आज सकाळी मराठी भाषा कार्यक्रमात माईक बंद पडला. मराठी गौरव गीताचे शेवटचे कवडे गाळले. कोणीतरी जाणीवपूर्वक मराठीचा खेळखंडोबा करत आहे. हे मुद्दाम केले जातेय का? अशी टीका माजी  अजित पवार यांनी केली.