मुंबई : दर रविवारी दुरुस्ती कामांसाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. यात रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तीन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे सकाळी १०.३० वाजता शेवटची गाडी सोडण्यात येते. त्यानंतर ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येतो. हार्बरवरही कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन तर पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय. तसी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रविवार, २२ एप्रिल, २०१८. सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजता. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल आहेत.
रविवार, २२ एप्रिल, २०१८. सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजता. मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार असून कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. अप धीम्या मार्गावरील नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकात लोकल गाडयांना थांबा देण्यात येणार नाही.
रविवार, २२ एप्रिल, २०१८. सकाळी १०.३५ ते दुपारी३.३५ वाजता. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असून बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविणार. बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक एक ते चार नंबरवर तसेच राम मंदिर स्थानकातही कोणतीही लोकल थांबणार नाही.