मेट्रो प्रकल्प अधिभार; मुद्रांक शुल्कात वाढ, घरांच्या किंमतही वाढणार

Metro project surcharge : राज्यात चार प्रमुख शहरांत मेट्रो प्रकल्पाचे (Metro project ) काम सुरु आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात ( stamp duty) वाढ होण्याची शक्यता आहे.  

Updated: Feb 15, 2022, 11:53 AM IST
मेट्रो प्रकल्प अधिभार; मुद्रांक शुल्कात वाढ, घरांच्या किंमतही वाढणार title=
संग्रहित छाया

मुंबई : Metro project surcharge : राज्यात चार प्रमुख शहरांत मेट्रो प्रकल्पाचे (Metro project ) काम सुरु आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात ( stamp duty) वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात या व्यवहारांवर 1 टक्का अधिभार स्वीकारला जात होता. मात्र त्या अधिभाराला सरकारने कोरोना काळात सवलत दिली होती. ही सवलत 31 मार्चला संपत आहे. 

मुदतीचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई एमएमआर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्कात वाढ झाल्यास तसेच मेट्रो होणाऱ्या शहरांमध्ये मेट्रो अधिभार पुन्हा लागू झाल्यास एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत फ्लॅट खरेदीविक्री व्यवहारांची दस्त नोंदणी वाढण्याची शक्यता आहे. या सरकारच्या निर्णयामुळे घर खरेदी महागणार आहे. त्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.