मुंबई : महागाईनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी... दुधाचे दर प्रती लिटरमागे चार रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यातल्या १६ दूध संघांनी दुधाचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून नवीन दर लागू होतील. त्यामुळे सध्या ४२ रुपये असलेला दर ३८ रुपये होईल... तर, ४४ रुपयांचा दर ४० रुपयांवर येईल. फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे. या निर्णयामुळे इतर दूध संघही दर कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दुधाचे दर कमी केलेल्या १६ दूध संघ दहा लाख लिटरहून अधिक पिशवीबंद दुधाची विक्री करतात. सोनाई , ऊर्जा, स्वराज, गोविंद, आनंद, संतकृपा, किसान, माऊली, नॅचरल, शांताई, शिवप्रसाद, कन्हैया, नेचर, जे. डी. थोटे, गोशक्ती या दूध संघांनी दूध दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.