आताची मोठी बातमी । मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज

Mumbai Threat News​ : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

Updated: Aug 20, 2022, 09:24 AM IST
आताची मोठी बातमी । मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Threat News : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे.

या  हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणाची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. या दहशतवादी धमकीने मुंबईसह देशाचं टेन्शन वाढवले आहे. मुंबईला उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातून आली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे. तर काल काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या मोहम्मद यासीन याला अटक केली आहे. तर त्याआधी रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी बेवारस बोटीत घातक शस्त्रास्त्र सापडली होती. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. पण, या सर्व घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.