मुंबई : देशात जीएसटी लागू केल्यानंतर अनेकांकडून स्वागत झाले. मात्र, काहीनी तीव्र विरोध केला. सामान्यांना या जीएसटीचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य जनता या जीएसटीच्या करामुळे हैराण होती. या जनतेला आचा दिलासा मिळणार आहे. ९९ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लागणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मोदी मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जीएसटी लागू करण्याआधी नोंदणीकृत कंपन्यांची संख्या ६५ लाख होती, ज्यामध्ये ५५ लाखांची भर पडलीय असंही मोदी म्हणालेत. चैनीच्या काही वस्तूंवर २८ टक्के जीएसटी असेल, बाकी वस्तूंवर २८ टक्के कर राहणार नाही असं मोदी म्हणालेत. सर्वसामान्य जनता वापरते अशा या ९९ टक्के वस्तू कमी करांमध्ये आल्या तर त्याचा सर्व जनतेला लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. तसंच कंपन्यांसाठी जीएसटी जितका सुलभ करता येईल तितका करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
PM @narendramodi is addressing a public meeting in Kalyan. Watch. https://t.co/N9hpktAkWn
— PMO India (@PMOIndia) December 18, 2018
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो-५ च्या टप्पा कामाचे भूमिपुजन केले. पंतप्रधानांनी मेट्रो-५ नंतर मेट्रो-९ या मेट्रो प्रकल्पाचं रिमोटनेच भूमिपुजन केलं. याचसोबत, पंतप्रधानांनी सिडको गृहप्रकल्पाचं भूमीपूजन करत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच जणांना घरांचा ताबा पत्रंही दिलं.