मुंबई : सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली. प्रत्येकजण आपापल्या परीने ईयर एंड(Year End) आणि न्यू ईयर सेलिब्रेशनची (New Year Celebration)तयारी सुरु केलीय. पण कोरोना संकटामुळे यंदाचे सेलिब्रेशन दरवर्षीपेक्षा वेगळं असणार आहे.
गच्चीवरील पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच असणार आहे. मुंबई पोलीस ड्रोनद्वारे गच्चीवर होत असलेल्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6पर्यंत जमावबंदी असल्याने चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 35 हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहेत.