'आमचा एकही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही'

याविषयी आपण अधिकृतपणे सायकांळी 5 नंतर बोलणार असल्याचं भाजपाकडून 

Updated: Nov 11, 2019, 02:32 PM IST
'आमचा एकही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही' title=

मुंबई : आमचा एकही आमदार हा भाजपाच्या संपर्कात नसल्याचा दावा भाजपच्या सुत्रांनी केला आहे. याविषयी आपण अधिकृतपणे सायकांळी 5 नंतर बोलणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. भाजपाचे 7 आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा, राष्ट्रवादीतील सुत्रांकडून करण्यात येत होता.

हा दावा भाजपातील सुत्रांकडून खोडून काढण्यात आला आहे की, अजित पवार यांच्या संपर्कात भाजपाचे 7 आमदार आहेत. राष्ट्रवादीतील सुत्रांकडून असंही सांगण्यात येत आहे की हे सात आमदार पुन्हा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास तयार आहेत.

पण भाजपाकडून आपली अधिकृत भूमिका मांडल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदरीत जिकडे सत्ता तिकडे पळण्याची तयारी काही आमदारांची असल्याचं दिसून येत आहे.