आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी

  मागील दोन दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीवरून संपावर आहेत. मात्र आपल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. 

Updated: Oct 18, 2017, 07:21 PM IST
 आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  मागील दोन दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीवरून संपावर आहेत. मात्र आपल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. 

आपल्या राज्यातील एसटी चालकाचा पगार - 4700 ते 15367 रुपये आहे
तेलंगनामध्ये - 13070 ते 34490
कर्नाटकात - 12400 ते 17520
राजस्थानमध्ये - 5200 ते 20200
उत्तर प्रदेशात - 5200 ते 20200

तर आपल्या राज्यातील एसटी वाहकाचा पगार - 4350 ते 14225
तेलंगनामध्ये - 12340 ते 32800
कर्नाटकात - 11640 ते 15700
राजस्थानमध्ये - 5200 ते 20200
उत्तर प्रदेशात - 5200 - 20200
इतका पगार आहे.

याशिवाय इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो. मात्र आपल्या राज्यातील एसटी चालक-वाहकांना हा ग्रेड पे मिळत नाही. दुसरीकडे इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के इतका आहे, तर आपल्या राज्यात हा प्रवासी कर 17.5 टक्के इतका आहे. असं असतानाही आपल्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी का असा सवाल एसटी कर्मचारी करत आहेत.

राज्यातील एसटी कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीवरून मागील दोन दिवसांपासून संपावर आहेत. आपल्या शेजारील इतर राज्यातील परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची आणि राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची तुलना केली तर आपल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे.