कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : तुम्ही आम्ही अतिशय आवडीनं पाणीपुरी खातो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुमचा संताप अनावर होईल. तुमची आवडती पाणीपुरी कशी तयार होते याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा डर्टी प्रकार मुंबईत घडल्याचाही दावा केला जात आहे. झी 24 तासनं या व्हिडीओमागचं सत्य शोधून काढलं आहे.
पाणीपुरी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी आवडत नाही, असं म्हणणारी व्यक्ती सापडणं दुर्मिळच. मात्र याच पाणीपुरीचा एक डर्टी व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण यामध्ये पाणी पुरीत अक्षरश: लघवीचा वापर केला जात असताना दिसत आहे.
किळस येईल असाच हा प्रकार. या व्हिडीओतली व्यक्ती पाणीपुरीच्या गाडीवरील पाण्यात आपली लघवी मिसळताना दिसतेय. सोशल मीडियात हा व्हिडीओ मुंबईतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटक-यांनी अनेक सवालही उपस्थित केलेत.
पाणीपुरीवाल्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होतेय. हा व्हिडीओ खरंच मुंबईतला आहे का? या पाणीपुरीवाल्याला आपली लघवी पाण्यात मिळसण्याची गरजच काय? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केलं.
व्हिडीओ नेमका कुठला?
पाणीपुरीच्या ठेल्यावर लघवी मिसळण्यात येत असल्याचा हा व्हिडीओ खरा आहे. मात्र हा व्हिडीओ मुंबईतला नाही. गुवाहाटीच्या आठगाव भागात हे किळसवाणं कृत्य घडलंय. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाणीपुरी विक्रेत्याला अटक केलीय.
हा व्हिडिओ मुंबईतला नसला तरी आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळा. कुणी असा घाणेरडा प्रकार करत असेल तर पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ याची माहिती द्या. अशा डर्टी पाणीपुरीविक्रेत्यांना अद्दल घडायलाच हवी.