मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे किंवा रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय आता मुंबईत येता येणार नाहीये. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असताना आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली, राजस्थान, गुजरात या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी संसर्ग वाढू नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
People travelling from Delhi, Rajasthan, Gujarat and Goa to carry RT-PCR negative test report: Maharashtra Government#COVID19 pic.twitter.com/17Wr5DECKD
— ANI (@ANI) November 23, 2020
राज्यात रुग्णसंख्या वाढली तर दुसरा लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा विचार असून आठ दिवसात आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं राज्यातील मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याआधीच म्हटलं आहे.
इतर राज्यातून मुंबईत आणि राज्यात येणाऱ्या रेल्वे आणि विमान सेवा तात्पुरता थांबवण्याबाबत ही सरकार विचार करत आहे. रुग्णांची संख्या वाढत राहिली तर सरकार याबाबत कठोर निर्णय घेऊ शकते.