पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Updated: Nov 23, 2019, 09:05 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन title=
संग्रहित फोटो

मुंबई : महाराष्टाचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता राजभवनात हा शपथविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असा विश्वास असल्यास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'हे सरकार महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणासाठी सातत्याने वचनबद्ध राहील आणि राज्यात प्रगतीचे नवीन मापदंड स्थापित करतील' असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे राज्यात महाविकासआघाडी सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना महाराष्ट्रात हा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरु असताना अचानक शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एका रात्रीत राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे.