मुंबई : शुक्रवारी PMC बँकेच्या पाचव्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, अखेर संतापलेल्या खातेदाराकांनी एशियाटिक लायब्ररी समोर आज PMC बँकेच्या खातेधारकांनी मोर्चा काढला होता. PMC बँकेतील पैसे मिळावेत यासाठी गेली काही दिवस खातेधारक आंदोलन करत आहेत.अजून किती बळी घेणार असा प्रश्न खातेधारक विचारत आहेत. बँकेचे खातेदार यामुळे अधिकच संतप्त झाल्याचं पहायला मिळालं.
आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्या आहे. ज्यामुळे खातेधारकांना ठराविक रक्कमच बँकेतून काढता येत आहे. पीएमसी बँकेत अनेकांचा पैसे अडकले आहेत. त्यामुळे खातेधाकरांची गैरसोय होत आहे. आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने खातेधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. पीएमसी बँकेतील ही १७ लाख खाती नाहीत तर ही १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुरलीधर धारा हे पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचे तिसरे बळी ठरले आहेत. याअगोदर फटतो पंजाबी आणि संजय गुलाटी या दोन खातेधारकांचा तणावामुळे मृत्यू झाला होता.
आणखी एका मृत्युमुळे खातेधारकांमधील रोष आणखी वाढला असून अजून किती बळी बँक आणि प्रशासन घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे.