मुंबई : पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल आणि शिक्षणासाठी तसेच आपात्कालीन परिस्थितीत ५०,००० रुपये त्यांचा खात्यातून काढता येणार आहेत. त्याआधी बँकेतून ४० हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. आता त्याशिवाय अतिरिक्त हे ५० हजार रुपये काढता येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणासाठी याची मदत होणार आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना थोडासा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. दरम्यान, पैसे बँकेत अडकल्याने याचा धक्का सहन न झालेले बँकेचे ठेवदार आणि खातेदारांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
#PMCBank now ₹50,000 withdrawal (in addition to ₹40,000) allowed for medical/education urgency. needy person has to apply to their branch
पी एम् सी बैंक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजेंसी साठी अधिक ₹५०,००० त्यांचा खात्यात्तुन काढू शकणार @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 23, 2019
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे बँकेच्या खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. पैसे असूनही त्याचा वापर करता येत नाही. तसेच पैसे मिळतील की नाही, याबाबत नैराश्य आले आले. काहीना मानसिक धक्क्याने आतापर्यंत सहा खातेदारांचा मृत्यू झाला. पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल, शिक्षण या कारणांसाठी ४० हजारांच्या मर्यादेव्यतिरिक्त ५० हजार रुपये काढू शकतात, असे ट्विट माजी खासदार किरट सोमय्या यांनी केले आहे.